Humanity is being destroyed



       आपण किती व्यस्त, मग्न आणि अहंकारी बनले गेलो आपल्या देवा धर्माच्या मागे  , आपल्या धर्माप्रति असलेला   कट्टरता वादिपणा याच्या नादात आपण ' मानवता '   हाच एक धर्म जो मानायला हवा तोच आपण विसरलो .कारण हे मला माझ्या एका अनुभवातून लक्षात आले. काल मि काही घरगुती सामान आणायला आमच्या कॉलनी मधल्या दुकानात गेलो होतो , त्यावेळी दुकानदार काकां होते , तसे ते काका स्वभावाने खुप निर्मळ आणि चांगले आहेत त्यावेळी मी बोलता बोलता काकांना सहजच एक विचारले की काय मग काका किती रुग्ण आहेत मुर्तीजापुर मध्ये आता ?  तेव्हा ते मला म्हणाले एक जण आढळला आणि तो मुस्लिम आहे , यांनीच तर आणला हा कोरोना , यांच्यामुळे भारत एकदिवस नष्टच होईल ,ते त्यांनी अशामूळे म्हंटले की कारण तो जातीने मुस्लिम आहे .यात kakachi  काही चूक नाही म्हणा कारण जी काही माहिती मीडिया ,whatsapp, social मीडीया सारख्या भ्रष्ट लोकांकडून कडून आपल्याजवळ येते त्यामुळे आपल्या मध्ये dusrya dharma prati राग, aani aaplya dharma prati अहंकार यासारख्या भावना निर्माण होतात आणि आपल्याला योग्य प्रकारे विचार करण्याची चिकित्सक व्रुत्ती संपवण्याच्या मार्गावर नेत आहे .
       अखेरीस हेच म्हणेन की, आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंत हे सर्व  सोडून ' मानवता ' हाच एक धर्म आहे आणि तोच पाळावा हि आपणास हाथ जोडून नम्र विनंती करतो कारण खरा धर्म हा माणसाला मित्रा बरोबरच शत्रूवरहि प्रेम करायला शिकवतो आणि तोच धर्म सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे कारण  अश्या धर्माची  शिकवण हीच आज काळाची  गरज आहे

       जागे व्हा आणि आपली विचार करण्याची क्षमता वाढवा 

   आपल्या मध्ये कोण द्रुष्ट भावना निर्माण करतो याची आपण चिकित्सक बुद्धी ने तपासणी केली पाहिजे ,कारण ते लोक पहाडाच्या पलीकड च्या दरीत आणि आपण पहाडा च्या अलीकडच्या दरीत आणि त्यांना बघण्यासाठी आपल्याला पहाडा च्या टोकावर जावे लागणार पण तेही मनामध्ये त्यांच्या विषयी कुठल्याहि प्रकारचा द्रुष्ट भाव न ठेवता (म्हणजे मानवता धर्मा वर वाटचाल करून ).

Reason behind this  writing  is that when Muslims were gathered at Delhi for there program (markaj) that time 99%  news channel reporters where loudly said Corona virus is being spread by muslims those who present in that program. So question ❓ arises when wine shops were opened that time thousands of people was crowded in front of wine shops nobody(reporter)  explained  from which caste or religion did those people  belongs   , why? 

- ➡ Prajwal Barde*

Comments