"PROPOSE " हे एक युद्ध !

 


नमस्कार मित्रानो,


जेव्हा आपल्याला आवडणारी व्यक्ती हि आपल्या समोर असते तेव्हा खूप भारी, खूप छान वाटत असतं.

बरोबर ना ??

त्या व्यक्तीच्या नकळत एक सारखं त्या व्यक्तीकडे पाहण्यात एक वेगळीच मजा असते. त्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर आपण अगदी बारकाईने लक्ष ठेवत असतो. त्याची बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, dressing style, attitude अश्या सगळ्या गोष्टी वर लक्ष ठेवत असतो. त्या व्यक्तीची येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ, फेसबुक आणि व्हाट्सअँप वर किती वाजता online येतो या सगळ्या गोष्टीची माहिती आपण माहित करून घेतो. त्या व्यक्तीची GF किंवा BF आहे कि नाही याची देखील पूर्णपणे माहिती मिळवतो. जणू काही एखादं युद्धच लढायचं असतं अशी काही तयारी करत असतो.

एखाद्या युद्धामध्ये जसं एखादा राजा त्याच्या दुष्मनाविषयी माहिती मिळवतो तसंच काही आपण करत असतो. हे युद्ध म्हणजेच propose जे २ प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम करत असतं. तस तर पाहायला गेला तर propose करणे हे एक युद्धच म्हणायला काही हरकत नाही. जे प्रेमाच्या सुरुवातीला लढावं लागतच. या युद्धात प्रत्येक जण विजयी होतोच अस नाही. काही जण पराभूत होतात. तर काही जण यशस्वी होतात, काही जण हे युद्ध नको म्हणून मैत्री नावाचा प्रस्ताव ठेवतात, काहींना तर युद्धच करायला मिळत नाही कारण ते युद्ध नुकताच दुसऱ्या कोणी नवीन राजाने जिंकलेलं असतं. काही काही तर आपण पराभूत होणार या भीतीने युद्ध करण्याचे टाळतात.

तर मित्रानो शेवटचं इतकचं सांगेल कि एकदा तरी प्रत्येकाने हे युद्ध लढलं पाहिजे. आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी एक प्रयत्न तर केलाच पाहिजे प्रत्येकाने. विजयी होणार किंवा पराभूत होणार हे तुम्ही कश्या प्रकारे युद्ध लढणार त्यावर अवलंबून असणार.



धन्यवाद ! 

Comments